आदर्शगावं जोगेश्वरी हागणदारी मुक्त फलकावरच

पुणे (पंढरी गायकवाड) – जोगेश्वरी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते , आदर्श गाव म्हंटल की समोर उभा राहतो गावातील सुविधांचा डोंगर, की या गावात किती सुख सुविधा गावकऱ्यांना मिळत असतील , गावातील सुरवातीला गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला एक बोर्ड आहे त्यावर लिहिले आहे की ” स्वच्छ आणि हागणदारी मुक्त गावात आपले सहर्ष स्वागत करत आहेत” मात्र थोडं समोर गेलं की गावात जाणार रोड आहे त्यावर वेगळाच प्रकार बघायला मिळतो ,
उघड्यावर गावातील नागरिक सौचालयाला बसतात , म्हणजे गावात येताना लोकांचे स्वागत हागणदारी मुक्त नसून हागणदारी युक्त जोगेश्वरी गाव आपले सहर्ष स्वागत आहे असा अर्थ होतो, गावातील मध्यभागी काही रस्ते आहेत नाल्या आहेत त्यावर पाणी साचून राहत,नाल्यांमध्ये गवत उगवले आहे, यामुळे रोगराई पसरते लहान मुले बाहेर अंगणि खेळतात त्यांना या घाणीचा सामना करावा लागतो त्यामुळे साथीचे आजार होण्याची भीती वाढत आहे, पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना त्याच काही घेणं देणं नाही १४ वित्त आयोगाचा पैसा कुठं खर्च केला हे कागदोपत्री सरपंच व ग्रामसेवक यांनाच माहिती,
गावातील जनतेला अंधारात ठेऊन सर्व सुविधांपासून वंचित राहावे लागते, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी मुळे जोगेश्वरी गावात दुर्लक्ष होत आहे, गाव हे आदर्श कसे असायला हवे हे यातून समजतं, आदर्श गावाच्या नावाखाली लाखोचा निधी हडप करून स्वतःची घरे शहराच्या ठिकाणी बांधणे सुरू आहे मात्र गोर गरीब नागरिकांना अजून घरकुल आवास योजना,रमाई आवास योजना पासून वंचित ठेवले जाते त्याना पत्राच्या,मातीच्या,झोपडपट्टी मध्ये राहावे लागते ,अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गावात पाहणी करावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी ,अशी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे, कोणी आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या आदर्श गावात केला जातो असे हे रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी गाव कसे आदर्श आहे हे सरपंच ग्रामसेवक यांनाच माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here