मृतात अंगणवाडीत स्वयंपाक करायला निघालेल्या १२ महिलांचा समावेश
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – आजची सकाळ ग्वाल्हेरवासियांसाठी दुःखदायी उजाडली आहे. सकाळी सकाळी ऑटो आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ऑटो ड्रायव्हर आणि 12 महिलांचा मृत्यू झाला. सर्व महिला अंगणवाडीत मुलासांसाठी जेवण बनवण्यासाठी जात होत्या. 9 महिला आणि ऑटो ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन महिलांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्व 12 महिला दोन ऑटोंमधून जात होत्या परंतु रस्त्यामध्ये एक ऑटो खराब झाला. त्यानंतर खराब झालेल्या ऑटोमधील सर्व महिला दुसऱ्या ऑटोमध्ये बसल्या आणि अपघातामध्ये सर्व महिलांवर काळाने घाला घातला.
ऑटो ग्वाल्हेरकडून मुरैना रोडवर चमन पार्ककडे जात होता तर बस मुरैनावरून ग्वाल्हेरकडे येत होती. हा अपघात आनंदपूर ट्रस्ट रुग्णालयासमोर झाला. स्थानिक लोकांच्या माहितीनंतर छावणी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले.






