मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशातील राजधानीत केजरीवाल सरकारकडून एक मोठा बद्दल केला गेला आहे. यावेळी एक्साईड पॉलिसीमध्ये केजरीवाल सरकारने बदल केला. याअंतर्गत राजधानीतील सर्व बेकायदेशीर दारूची दुकाने बंद करण्यात येणार आहेत.
या व्यतिरिक्त दारूच्या दुकानासाठी नवे नियम सुद्धा जाहीर केले जातील. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात दारूची अवैध तस्करी बंद होईल, तसेच दिल्लीत दारू पिण्याचे कायदेशीर वय आता २१ वर्षे असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी याची घोषणा केली. त्यांनी असेही म्हटले की यापेक्षा कमी वयाच्या अशा ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही, जेथे दारू दिली जाते. याशिवाय राष्ट्रीय राजधानीत नवीन दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.






