प्रसिद्ध गायक महेश काळे यांना कोरोनाची बाधा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांमध्ये देखील संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता प्रसिद्ध गायक महेश काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

महेश काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अतिशय काटेकोर पद्धतीने सर्व नियमांचे पालन करून आणि अत्यंत काळजी घेऊन देखील मला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे मी करोनाचं लसीकरणंही केलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अगदी अल्पप्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. तरीही मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. जोवर डॉक्टर मला मी पूर्णपणे बरा झाल्याचे सांगत नाहीत तोवर मी क्वारंटाइनच राहीन. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेसाठी मनापासून आभार.

दरम्यान, महेश काळे लवकरच ‘सुर नवा ध्यास नवा.. आशा उद्याची’ या गायनाच्या रिॲलिशी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या 5 एप्रिलपासून हा शो कर्लस मराठीवर सुरु होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here