मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जातोय. भारताचा सलामीवीर गब्बर शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला आहे.
शिखर धवनचे अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे. शिखर धवन 98 धावांवर कॅच आऊट झाला. धवनला अवघ्या २ धावांची गरज होती. लवकरात लवकर शतक लावायचं होतं. मात्र स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर शिखरने कर्णधार इयोन मॉर्गनच्या दिशेने फटका मारला. मॉर्गनने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. अशाप्रकारे धवन आऊट झाला. धवनने १०६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारासंह ९८ धावांची खेळी केली.






