उत्तराखंड येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये १३० लोक बेपत्ता

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – उत्तराखंमधील चामोली जिल्ह्यातील तपोवन भागात ७ फेब्रुवारीला ग्लेशियर फुटल्यामुळे मोठा पूर आला होता. या पुरात अनेक गावांचे नुकसान झाले असून अनेक घरे वाहून गेली.

या घटनेला आता जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे मात्र अजूनही या पुरात गायब झालेल्या काही लोकांची माहिती मिळू शकली नाही. गृह मंत्रालयाने लोकसभेत उत्तराखंडमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसांविषयी भाष्य केले आहे. लोकसभेत एक प्रश्न विचारला गेला, ज्याच्या उत्तरात गृह मंत्रालयाने सांगितले की उत्तराखंडमधून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७४ मृतदेह सापडले आहेत आणि १३० लोक अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here