अभिनेत्रीच्या पतीनं शेअर केला तिचा बाळाला स्तनपान करताना करतानाचा फोटो

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री अमृता रावनं २०१६ मध्ये आर जे अनमोलशी लग्न केलं होतं. आता या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. अनेकदा हे दोघंही त्यांच्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच अमृतानं आर जे अनमोलचा मुलगा वीरसोबतचा एका व्हिडीओ शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अनमोलनं अमृताचा बाळाला ब्रेस्टफीड करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत एक सुंदर पोस्ट सुद्धा लिहिली आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमृता राव आणि आर जे अनमोल आई-बाबा झाले आहेत. त्यानंतर ते आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अमृता आणि अनमोल यांनी आपल्या बाळासाठी नॅनी ठेवलेली नाही. ते दोघं मिळून त्याची काळजी घेतात. अशात आता अनमोलनं सोशल मीडियावर शेअर केलेला अमृताचा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो शेअर करताना अनमोलनं हा फोटो खरा आणि जादुई असल्याचं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अमृता व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे. पाठमोऱ्या बसलेल्या अमृताच्या कुशीत तिचा मुलगा आहे.

आर जे अनमोलनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘वीरला दूध पाजणाऱ्या अमृताला पाहणं माझी आवडती गोष्ट आहे. हे खूपच वेगळं पण तेवढंच जादुई सुद्धा आहे आणि खूप पवित्र सुद्धा. हे खूपच कठीण काम आहे. पूर्ण रात्र, पूर्ण दिवस, आणि असं करताना तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. आई आणि मुलाचा मी खूपच सुंदर बॉन्ड पाहिला आहे. तुला मी सॅल्यूट करतो. मी माझ्या आईला सॅल्यूट करतो आणि या जगात असलेल्या सर्व आईंना सुद्धा. यासाठी मदर्स डेची वाट का पाहावी.’
https://

आर जे अनमोलची ही सुंदर पोस्ट आणि त्याचे विचार याचं सर्वच चाहते कौतुक करताना दिसत आहेत. अनमोलच्या अगोदर अमृतानंही काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तो आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये अनमोल वीरला मालिश करताना, त्याला अंघोळ घालताना आणि झोपवताना दिसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here