एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना घेता येणार कोरोना लस; प्रकाश जावडेकरांची माहिती

नवी दिल्ली – एक एप्रिलपासून आता ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. ते केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देत होते.

जावडेकर म्हणाले, की आतापर्यंत देशात एकूण ४ कोटी ८५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यांपैकी ८० लाख लोकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून, आपल्याकडे लसींची कमतरता नसल्याचेही जावडेकर यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here