डायलिसिस करण्यासाठी लाच मागणाऱ्या डॉक्टरसह दोघांना रंगेहात पकडले

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत औषधोपचार पूर्णपणे मोफत असतानासुद्धा तक्रारदाराकडून 9 हजारांची मागणी करून लाच स्वीकारणाऱ्या खासगी डॉक्टरसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय 58, पवना हॉस्पिटल रा. सोमाटणे फाटा, मावळ) आणि प्रमोद वसंत निकम (वय 45, खाजगी मार्केटिंग ऑफिसर,पवना हॉस्पिटल) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.

सोमाटणे फाटा परिसरात डॉ. सत्यजित वाढोकर यांच्या रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसीसचे मोफत उपचार आहेत. असे असतानाही डॉ. सत्यजित यांनी तक्रारदाराच्या वडिलांचे डायलेसिस करण्यासाठी 9 हजारांची मागणी केली. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रमोदला तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here