नवी मुंबई नेरुळ प्रभाग क्रमांक 92 मधील गटारे व पदपथ दुरुस्त करा : गुरुनाथ नाईक

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई प्रभाग क्रमांक 92 सेक्टर 21 मधील गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत यामुळे वाहनचालक याना देखील वाहन चालविणे कठीण झाले आहे

रस्त्यावरील पदपथ यावर खड्डे पडले आहेत यामुळे जेष्ठ नागरिक महिला व लहान मुलांना त्रास होत आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी गटारे व पदपथ यांची तातडीने दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना सुखकर होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांनी नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांजकडे निवेदन देऊन केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here