मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – आज २४ दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे दिसून आले आहे.आज डिझेल १७ आणि पेट्रोल १८ पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ९०.९९ रुपये तर डिझेलचे दर ८१.३० रुपये प्रति लीटर झाले आहे.
प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होतात. त्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या दरांमध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश असल्याने त्याचे दर दुप्पट होतात.तर जाणून घ्या प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर:
>>दिल्ली
डिझेल: ८१.३० रुपये, पेट्रोल: ९०.९९ रुपये
>>कोलकाता
डिझेल: ८४.१८ रुपये, पेट्रोल: ९१.१८ रुपये
>>मुंबई
डिझेल: ८८.४२ रुपये, पेट्रोल: ९७.४०रुपये
>>चेन्नई
डिझेल: ८६.२९ रुपये, पेट्रोल: ९२.९५ रुपये






