नवी दिल्ली – पुढील आठवड्यात तुमच्या अनेक आर्थिक कामांना ब्रेक लागू शकतो. कारण हे की पुढील आठवड्यात अनेक कारणांमुळे बँकेला सुट्ट्या असणार आहेत. अनेक सरकारी तसेच खासगी बँका या आठवड्यात व पुढील आठवड्यात मिळून फक्त चार दिवसांसाठीच उघड्या राहणार आहेत.
सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका कमी काळासाठी उघड्या राहणार आहेत, त्यामुळे आपल्या आर्थिक कामांचं नियोजन त्यानुसारच ग्राहकांनी करायला हवे. मात्र, मोबाईल तसेच इंटरनेट बँकींगमध्ये यादरम्यान कसलाही अडथळा येणार नाहीये.
बँका किती दिवस बंद राहणार…
२७ मार्चला चौथा शनिवार आहे त्यानंतर रविवार २८ मार्च, सोमवारी दि. २९ मार्चला धुलिवंदनाची बँकांना सुट्टी असणार आहे. मंगळवारी दि. ३० मार्चला बँक सुरु राहील. दि. ३१ मार्च बुधवार मार्च एण्डची कामांकरिता बँक बंद असेल तर १ एप्रिलला गुरुवारी बँकेचे कामकाज बंद राहिल. दि. २ एप्रिलला गुरुवारी बँकांना गुडफ्रायडेची सुट्टी असेल, त्यानंतर बॅका दि. ३ एप्रिलला म्हणजे शनिवारी उघडतील व लगेचच दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बंद असतील.






