मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशभरासह राज्यात आणि शहरात सुद्धा कोरोनाचा उद्रेक होत आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सामान्य नागरिकांसह अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांना कोरोनाने घेरले.
अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, निक्की तांबोळी यांनतर आता अभिनेता आमिर खानचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सध्या आमिर होम क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
आमिर याच्या एका प्रवक्ताने असे म्हटले आहे की, आमिर याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तो होम क्वारंटाइनमध्ये असून सर्व नियमांचे पालन करत आहे. त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.






