शिर्डी येथील कोवीड सेंटर पूर्वीप्रमाणे सुरू करावे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोणाचा फैलाव झालेला असुन साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील कोविड सेंटरमध्ये सुरू असलेली एक ईमारत यासाठी पुरेशी नसल्याने रूग्ण दाखल करून घेणं गैरसोयीच होत आहे.नाशिक,अहमदनगर,तसेच परिसरातील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने तेथे जागा उपलब्ध नाही, खाजगी कोविड सेंटर मध्ये गोर-गरीब रूग्णांना अव्वाच्या-सव्वा बिलामुळे उपचार घेणे जिकरीचे बनले आहे.

सुरुवातीच्या काळात शिर्डी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी गेले आहे.या मुळे अनेक रुग्णांचे कोट्यवधी रुपये येथील कोविड सेंटर मुळे वाचले आहेत.उत्कृष्ट चहा,दूध,जेवण,चांगले डॉक्टर, नर्स, कर्मचारी, स्वच्छता यामुळे सर्व रुग्णाच्या पसंतीला उतरले आहे. अडचणीच्या काळात श्री साईबाबा संस्थानचा शिर्डी आणि परिसराला आधार आहे.कोरोणा महामारीच्या काळात शिर्डी येथील कोविड सेंटर अत्यंत उपयुक्त ठरले होते. त्याचबरोबर आजही चांगल्या प्रकारे सुरू आहे. मधल्या काळात रुग्ण संख्या घटल्याने चार इमारती बंद करून एक इमारत सुरू ठेवण्यात आली होती. परंतु आता कोरोणाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे.

shirdi-shivsena-nivedan

त्यामुळे बंद केलेल्या चार ईमारती पूर्वीप्रमाणेच तातडीने कोवीड सेंटर म्हणून सर्व सुविधांसह खुल्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टर, नर्स, कर्मचारी, औषधे, पी.पी.ई.कीट,एन 95 मास्क व ईतर साहित्य उपलब्ध करून द्यावेत. सद्यस्थिती मध्ये शिर्डीत लॉकडाउन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शिर्डीत साई भक्तांची वर्दळ कमी झाल्याने येथील बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यातच कोरोनाने कहर सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आपणास आग्रह पूर्वक विनंती करण्यात येते की, श्री साईबाबा संस्थानच्या पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती शासनाने कोविड सेंटर म्हणून सुरु कराव्यात. निवेदन देताना प्रात शिंदे साहेब व उप कार्यकारी रविंद्र ठाकरे साहेब या दोघांना स्वतंत्र निवेदन दिले आहे.

यावेळी शिवसेनेचे वतीने कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, विठ्ठल पवार, पुडलिक बावके,सुयोग सावकारे, प्रसाद पाटील, अमर गायकवाड, अक्षय तळेकर, रमेश गागरे,मदन मोकाटे, सचिन गाडेकर, आरबाज कादरी, सुवरनेश् साबळे,संतोष वाघमारे,मोहसीन सय्यद,कृष्णा वाघमारे,आसिफ सय्यद, अनीस शेख,दीपक कोते, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here