मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – मीरा भाईंदर शहरातील पोलीस प्रशासनाकडूनच मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात चक्क बेकायदा जाहिरातबाजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याकरिता झाडाचा वापर करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या जाहिरातीवर जनहितार्थ माहिती देण्यात आली असली तरी हे फलक थेट रस्त्यावरील चौकात झाडाच्या आधारे बांधण्यात आले आहेत.
त्यामुळे जर पोलीस प्रशासनच नियम मोडणार असेल तर इतर नागरिक नियम कसे पाळणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. आता पोलीस प्रशासनावर कारवाई होईल कि नाही? हे अद्याप ही गुलदस्त्यात आहे.






