वडाळा येथे क्रिकेटच्या सामन्यांचा उदघाटनावेळी फडणवीसांची तुफान फटकेबाजी
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – क्रिकेटमध्येबॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हाबॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींगकरायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय,मीवेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन,तेव्हाशॉट्सदेखील खेळणार आहे”, असं
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवरसध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये परमवीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मीशुक्ला यांचं फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप करत, आज क्रिकेटच्या भाषेत त्यांनीसत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीकेलेल्या “शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं” या मागणीवर देखील फडणवीसांची खोचक टोमणा मारला. “युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो”, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवरखोचक टिप्पणी देखील केली. “सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही.
मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते”, असं देखील म्हणाले. “माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट दिसतंय. जे संभाषण झालंय, जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालंय,त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
“एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हेपाहिलं पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणंचमूर्खपणाचं आहे असं ही आज फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वडाळा येथे क्रिकेटच्या सामन्यांचा उदघाटनावेळी माध्यमांशीसंवाद साधताना त्यांनी म्हटले. यावेळी फडणवीस यांनी क्रिकेटदेखील खेळ खेळले वजुन्या आठवणींना उजाळा दिला.






