उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रशासनाला कोरोना विरोधातील लढाईत मदत म्हणून ७५० लिटर सोडीयम हायपोक्लोरिड सुपूर्द

जळगाव (निलेश पाटील) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफ्फुल लोढा यांच्यावतीने जळगाव जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला कोरोना विरोधातील लढाईत मदत म्हणून सोडीयम हायपोक्लोरिड सुपूर्द करण्यात आले.
प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे 750 लिटर सोडियम हायपोक्लोरिड सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, संजयदादा गरुड, महानगर युवकअध्यक्ष स्वप्नील नेमाडे, महानगर सचिव कुणाल पवार तसेच इतर पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here