जळगाव (निलेश पाटील) – गेल्या काही दिवसांपासून शहरात पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
त्यामुळे शहरातील विविध भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरत असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे गाळसह शेवाळ काढून साफसफाई करावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हा शिवसेनातर्फे महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील गेल्या काही महिन्यापासून पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची नागरीकांच्या तक्रारी होत आहे. फिल्टर प्लॅन्ट मधून येणारे पाणी पुरवठा व संबधीत प्रभाकामध्ये पाण्याच्या टाक्यामधून येतो व त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या टाक्यामध्ये जाते. तसेच शिवाजी नगर, खोटे नगर, पिंप्राळा, महाबळ, कालींका माता, एम.आय.डी.सी. या टाक्यामध्ये पाणीपुरवठा होत असतो. दोन/तीन वर्षांपासून ह्या टाक्याची साफसफाई एकदाही करण्यात आलेली नाही. यामुळे जळगावकरांना पिवळे व दुर्गधीयुक्त पाण्याला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने व सत्ताधारी महापौर व नगरसेवकांनी या गोष्टीची गांभीर्य कधी घेतली नाही. म्हणून आज जळगाव शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात येवू शकते. तसेच महापौर, पाणीपुरवठा महानगरपालिकेचे आरोग्य सभापती यांनी कधी या टाक्याजवळ येवून पाहणी केलेली नाही. तसेच पाणीपुरवठा टाक्या जीर्णावस्थेत आहेत. या टाक्यांचे जिने जिर्ण झालेले असून, ते कधीही कोसळू शकतात. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना साफसफाई करता येत नाही. तरी पाणी पुरवठा होत असलेल्या टाक्यांतील गाळ व शेवाळ काढून साफसफाई त्वरित करून जळगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनिलभाऊ महाजन, गटनेते नगरसेवक बंटीभाऊ जोशी, निलेश पाटील, गजानन मालपुरे, मंगलाताई बारी, विजय बांदल, चेतन शिरसाळे, नितीन जावळे, जितेंद्र गवळी, जितेंद्र बारी, दिनेश पाथरिया, विश्वास महांगडे, विजय राठोड, मोहन जाधव, सचिन क्षीरसागर, निशांत काटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Home Uncategorized शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याची शिवसेनेची मागणी







