उत्तरप्रदेशात डझनभर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लखनौ – उत्तर प्रदेशात योगी सरकारने डझनभराहून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. ए. सतीश गणेश यांची वाराणसीत तर असीम अरुण यांची कानपूरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वाराणसीचे एसएसपी अमित पाठक यांची गाझियाबाद डीआयजी म्हणून नेमण्यात आले. अखिलेशकुमार मीना आणि अनिल सिंह यांची वाराणसी येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. डीआयजी पुष्पांजली यांना नोयडात, तर मनोजकुमार आणि आकाश कुलहरी यांना कानपूरमध्ये पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आले आहे. पीयूष मोर्डिया यांची लखनऊ पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एलसीओ नवीन अरोरा यांना आग्रा रेंज, रमित शर्मा यांना बरेली रेंज, तर एस. भगत यांना वाराणसी रेंजचे आयजी म्हणून नियुक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here