मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वत:ला करोना झाल्याची माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.
करोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
सचिनने या पोस्टमध्ये डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. पोस्टच्या अखेरमध्ये त्याने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.






