पत्रकार सुर्यभान भास्कर पाटील यांचे निधन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार तथा कॅमेरामॅन सुर्यभान भास्कर पाटील यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना मागील काही दिवसापासून कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. दरम्यान, आज १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान निधन झाल आहे.

शहरातील महत्वाच्या घडमोडीसाठी नेहमी तत्पर, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व, इतरांसाठी नेहमी मदतीसाठी धावणारा पत्रकार आज काळाने हिरावून घेतला आहे. पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, त्यांना बुलंद पोलिस टाइम्स परिवारातर्फे आदरांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here