औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील हिरालाल खंडु गांगे (40) यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच त्यांच्या आईनेही प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याने हिरालाल गांगे यांच्यावर संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. दरम्यान आज पहाटे 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुळ गावी ब्राम्हणगाव येथे 11 वाजता अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती.
पुत्रवियोगामुळे झालेले दुख: त्यांच्या आई सखुबाई खंडु गांगे (70) यांना सहन झाले नाही. आणि त्यांनीही यावेळी जगाचा निरोप घेतला. माता आणि पुत्राचे एकाच दिवशी निधन झाल्याने गाव परिसरात शोककळा पसरली आहे.






