निलंगा – तालूक्यातील माकणी येथे पत्नीवर संशय घेऊन तिच्या डोक्यात हातोड्याने मारल्याची घटना घडली. मारहाण करताना सासूमध्ये आली म्हणून तिच्यावर हातोड्याचा वार करुन जखमी करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी औरादशहाजानी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता बालाजी सुर्यवंशी (वय 48वर्षे ) रा.माकणी ता निलंगा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांची मुलगी पुजा हिचे लग्न गावातीलच दत्तात्रय चंदर बामणे यांचेशी झाले आहे. मुलीच्या घराचे सध्या बांधकाम चालु असल्याने जावाई दत्तात्रय चंदर बामणे आणि मुलगी पुजा व नातु हे फिर्यादीच्या घरीच राहात होते.
मुलगी व जावई यांचेमध्ये थोडे बोलाबोली झाली. मुलीस जावाई हातोडयाने मारहान करत होता, मुलीच्या डोक्यात कानाखाली गंभीर दुखापत लागुन रक्त निघत होते त्यामुळे फिर्यादीने जावायास का मारत आहेस असे विचारत असताना त्याने फिर्यादीच्या कानावर हातोडयाने मारहाण केली त्यात कानाची नस पण तुटली आहे. मारहाण केल्यानंतर तो गाडीवर बसुन निघुन गेला. जखमींना उपचारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औरादशहाजानी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दत्तात्रय याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






