गुजरातकडे येणाऱ्या इस्राइलच्या जहाजावर झालेल्या मिसाइल हल्ला

मुंद्रा पोर्ट (गुजरात) – इस्राइलचे मालवाहू जहाज अखेर शुक्रवारी येथे दाखल झाले. या जहाजावर गुरुवारी मिसाइल हल्ला करण्यात आला होता. इस्राइलने या हल्ल्यामागे इराणला दोषी ठरवले आहे. पण, याची अद्याप पुष्टी झाली नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सांगितले की, ते या प्रकरणावर बारकाईने लक्ष्य देऊन आहेत. अद्याप भारत सरकारकडून या प्रकरणावर अधिकृतरित्या बोलण्यात आले नाही.

इस्राइलच्या जहाज कंपनीने म्हटले की, हे जहाज तंजानियावरुन भारताकडे येत होते. यावेळी जहाजावर एक मिसाइल आली. या हल्ल्यानंतर जहाजाचे इंजिन बिघडले आहे. या जहाजाचा मालकी हक्क एक्सटी मॅनेजमेंटकडे आहे. ही कंपनी सध्या इस्राइलमधील पोर्ट सिटी हाइफामध्ये आहे.

मागच्या महिन्यात ओमानच्या खाडीत एका इस्राइलच्या जहाजावर हल्ला झाला होता. 25 फेब्रुवारीच्या रात्री एमवी हेलियोस रे नावाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूने इराणला दोषी ठरवले होते. पण, इराणने या आरोपांचे खंडन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here