हत्याराने मारहाण करून तरुणाला लुटले

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ फायटरसारख्या लोखंडी हत्याराने मारहाण करून एका व्यक्तीला लुटल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किरण मारूती शिंदे (वय ३२, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिस ठाण्यात चारचाकी गाडीतील एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १८ मार्च रोजी सकाळी भापकर पेट्रोल पंपाजवळील सिग्नलवर थांबले होते. त्या वेळी उजवीकडील कारमधून आलेल्या एका व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. आरोपीने तक्रारदारांना गाडी थांबवण्यास जबरदस्तीने भाग पाडले.

त्यानंतर आरोपीने फायटरसारख्या लोखंडी हत्याराने तक्रारदारास मारहाण करून जीवे ठार करण्याच्या उद्देशाने जखमी केले. तक्रारदाराच्या शर्टच्या खिशातील रोकड व गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ४१ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. तक्रारदार करोनाबाधित असल्याने त्यांनी उशिरा तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here