कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांची चोपडा येथे भेट

  • उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटरची केली पाहणी
  • न.पा.प्रशासनातर्फे राबवण्यात आला कडक लॉकडाऊन

चोपडा (संदीप ओली) – संपुर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रसार हा वाढतच आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.कालपर्यंत चोपड्यातील बाधितांची संख्या 567 होती.अजुनही भरपूर अहवाल प्रतिक्षेत आहेत.त्याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचा आज चोपडा दौरा होता.त्यामधे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि,ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढलेला असुन कुणालाही कोरोनासदृश लक्षणे असल्यास त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येऊन तपासणी करुन घ्यावी कि जेणेकरुन त्यावर त्वरीत उपचार केल्या जाईल व कोरोनाचा प्रसारही होणार नाही.व सद्या सोशल मिडीयावर कोरोनाविषयी काही अफवा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेऊ नये व सरकारी यंत्रणेवर भरोसा ठेवावा असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी प्रांत सिमा अहिरे,पोलिस उपअधिक्षक सौरव अग्रवाल,तहसिलदार अनिल गावित व न.पा.मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांची उपस्थिती होती.
त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटरची पाहणी केली.तिथे त्यांनी अधिक्षक डाॕ.मनोज पाटिल व डॉ.पंकज पाटिल यांच्याकडून तेथील परिस्थिती जाणून घेतली.व तिथे असणार्या सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच मास्क वापरणे,सोशल डिस्टसिंग ठेवणे व स्थानिक बाजारपेठेतही नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी सुचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केली.
तसेच तालुक्यातील जनतेने विनाकारण बाहेर फिरु नये व शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रांत सिमा अहिरे,पोलिस उपअधिक्षक सौरव अग्रवाल,तहसिलदार अनिल गावित,न.पा.मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.लासुरकर व शहर पो.स्टे.प्रभारी पोलिस उपनिरिक्षक मनोज पवार व ग्रामीण पो.स्टे.प्रभारी पोलिस उपनिरिक्षक संदिप आराक यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी येण्याच्या अर्धा तासाअगोदर न.पा.प्रशासनाने शहरातील संपूर्ण दुकाने कुठलिही पुर्वसुचना न देता बंद करायला लावली कि जेणेकरुन जिल्हिधिकार्यांना असे वाटायला पाहिजे कि शहरात कडक लॉकडाऊन पाळल्या जातोय.परंतु यामुळे सर्वसामान्य धंदेवाले व फेरीवाल्यांचे नुकसान झाले.तरी यापूढे स्थानिक प्रशासनामार्फत बळजबरी होऊ नये हिच सर्वसामान्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here