जळगाव जिल्ह्यात आज २०० रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणीसाठी घेतलेले स्वॅबचा तपासणी अहवाल आज (दि.२१) प्राप्त झाले असून, त्यात जिल्ह्यातील १८३ कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण ८१८७ झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३९, भुसावळ ६, अमळनेर ४, चोपडा २५, पाचोरा २०, धरणगाव १३, यावल ४, एरंडोल ३, जामनेर १२, जळगाव ग्रामीण १२, रावेर १२, पारोळा १३, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर १०, बोदवड ५ असा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१८७ झाली आहे.
दरम्यान आज २०० रुग्ण बरे झाले आहेत तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंतची मृत व्यक्तींची एकूण संख्या ४१५ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here