सांगोला कारागृहातील २४ कैद्यांना कोरोनाची लागण

सांगोला (प्रतिनिधी कैलास शिंदे) – सांगोला जेलमधील 54 कैद्यांपैकी 24 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कैद्यांच्या संपर्कातील आलेल्या पोलीस कर्मचाऱयांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

दरम्यान, शहरात सर्व व्यापारी आणि त्यांच्या कामगारांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात शनिवारी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सांगोला जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 24 कैद्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या कैद्यांच्या संपर्कात अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास घेतला जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कोविड सेंटरमध्येही पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here