मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. येत्या 31 मार्चला गायिका राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असून मुंबईतील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
वैशाली माडे हिने’बाजीराव मस्तानी’ चित्रपटात गायलेले ‘पिंगा’ गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे मराठीतही तिने अनेक हिट्स गाणी दिली. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड निर्माण केला असून मराठी बिग बॉसमध्येही ती प्रचंड चर्चेत आली होती.
त्यात तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही बरीच माहिती समोर आली होती. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.






