जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची धरणगाव कोव्हीड सेंटरला भेट

धरणगाव (योगेश पी.पाटील) – जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी धरणगाव येथील कोव्हीड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्याशी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा समन्वय समिती अध्यक्ष गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तालुक्यातील नागरिक व ग्रामस्थांचे स्वॅब दिल्यानंतर त्यांचा रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागतात आपण जर आम्हाला रॅपीट टेस्टसाठी जास्तीचे कीट उपलब्ध करून दिल्यास तात्काळ रिपोर्ट येऊन उपचारही तात्काळ करता येईल जिल्हाधिकारी राऊत यांनी धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यात सर्व रॅपिड टेस्ट कीट उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले
कोव्हिड सेंटरच्या रुग्णांशी जिल्हाधिकारी साहेब चर्चा केली असता चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याची माहिती रुग्णांनी दिली. या प्रसंगी गुलाबराव वाघ.(शिवसेना जिल्हाप्रमुख), निलेश चौधरी.(नगराध्यक्ष), विनय गोसावी(प्रांताधिकारी)., नितीनकुमार देवरे (तहसीलदार), जनार्दन पवार (मुख्याधिकारी), प्रथमेश मोहोळ (नायब तहसीलदार), श्री.सोनवणे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ.गिरीश चौधरी (शल्यचिकित्सक), पवन देसले. पोलिस निरीक्षक) आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here