चोपडा (संदीप ओली) – जळगाव येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटिल यांनी चोपडा येथील अनुराग हुकुमचंद
पाटिल यांची ग्रामीण जिल्हाउपाध्यक्षपदी,सनी सचदेव यांची जळगाव जिल्हाउपाध्यक्षपदी,प्रफुल स्वामी यांची जळगाव जिल्हा सरचिटणिसपदी फेरनिवड व दोंदवाडे येथील मनोज युवराज पाटिल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड केली.व पाटिलगढी येथील शरद देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी फेरनिवड केली.या निवडीबद्दल पक्षाचे तालुक्याचे नेते मा.विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी,चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी व तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटिल यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन केले व तालुकाध्यक्ष राजेन्द्र पाटील यांच्या कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल,शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटिल,मोहसिन शेख इ.उपस्थित होते.







