मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. अभिनेता आमिर खान पाठोपाठ मागील आठवड्यात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकायला मिळाली. आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण या कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यातच आता आमिरची ‘दंगल’ चित्रपटात असलेली सहकलाकार फातिमा सना शेख हिला देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळत आहे.
फातिमाने सोशल मिडियावरुन आपण कोविड पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले आहे. आमिर आधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
फातिमाने सोशल मिडियावर पोस्ट लिहून सांगितले आहे की, “मला कोरोनाची लागण जाली आहे. सध्या माझी तब्येत चांगली आहे आणि मी योग्य ती काळजी घेत आहे. तसेच सर्व गाईडलाईन्सचे पालन करत आहे. त्याचबरोबर मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल तुम्हा सर्वांचे आभार” असे म्हटले आहे.






