आगामी चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतेय ‘ही’ अभिनेत्री!

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – गेल्या काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. तिने एका पाठोपाठ एक चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करण्याचा सपाटाच लावला आहे. सध्या ती आपल्या आगामी ‘शाबाश मिथु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तापसीने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं आहेत.

 

हा चित्रपट भारतीय महिला वनडे क्रिकेट टीमची कप्तान मिथाली राजच्या जीवनावर अधारित आहे. यामध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फिट दिसण्यासाठी तापसी मैदानात घाम गाळताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात तापसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लब्स आणि हेलमेट घालून धावपट्टीवर क्रिकेटच्या विविध शॉट्सचा सराव करताना दिसत आहे.

तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्रिकेटमधली डाऊन द लाइन शॉट खेळण्याचा सराव करत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं असून अवघ्या एका तासात या फोटोला 1 लाखाहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. तापसी पन्नु मिथाली राजच्या व्यक्तीरेखेसाठी स्वतःला तयार करत आहे. त्यासाठी ती खूप सराव करत आहे. आता तापसीची देहबोली महिला क्रिकेटर सारखी दिसू लागली आहे. तापसी मिथालीच्या शैलीने फलंदाजी करण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here