मुलींनी राहुल गांधी यांच्यापासून संभाळून रहावे; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान

इडुक्की (केरळ) – येथील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. प्रचारसभांना संबोधित करताना अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचेही दिसून येत आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधींपासून मुलींनी संभाळून रहावे, त्यांचे अजून लग्न झालेले नाही, असे जॉर्ज यांनी म्हटले आहे.

सीपीआयचे (एम) उमेदवार आणि नेते एम. एम. मणी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाला असून, जॉर्ज यांनी मर्यादा ओलांडल्याची टीका केली जात आहे. लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटच्या पाठिंबाव्यावर जॉर्ज अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते.

मुलींनी राहुल गांधी यांच्यापासून संभाळून रहावे, कारण त्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन अशापद्धतीने करण्यात आले आहे की, ते केवळ विद्यार्थीनी असणाऱ्या कॉलेजेला भेट देतात. तिथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवण देतात. सर्व विद्यार्थिनींना विनंती आहे की, त्यांनी राहुल गांधीसमोर वाकून उभे राहू नये, असे धक्कादायक विधान जॉर्ज यांनी केले.

केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. केरळ काँग्रेसने जॉर्ज यांच्या वक्तव्याचा निषेध करत केला आहे. सीपीआयला पराभव दिसू लागल्याने राहुल यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जात असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसकडून एक ट्विटही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here