दापोरा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघलेल्या विशाल शांताराम पवार (वय २७,रा. दापोरा,ता.जळगाव )या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल शांताराम पवार हा तरूण आई व बहिणीसह दापोरा येथे वास्तव्यास होता. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे तो तणावात होता. दरम्यान, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाहेर जावून येतो असे सागून दुचाकीने घराबाहेर पडला. शिरसोली व दापोरा दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून त्याने धावत्‍या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले.

घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मयताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here