माहेरी निघून गेल्याच्या संतापात धारदार शस्त्राने बायकोवर केले 128 वार

कोलकातानवऱ्याचे परस्त्रीसोबत संबंध असल्याचे कळल्यावर एक महिला नवऱ्याला सोडून माहेरी निघून गेली, पण एक दिवस अचानक ती सासुरवाडीच्या परिसरात दिसल्यावर नवऱ्याने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले.

कलकत्त्यातील हुगली येथील थाना चुचुडा परिसरातील चौकबाजार येथे राहणारे राजू मंडल यांची पत्नी एका खासगी लॅबमध्ये काम करत होती. राजू मंडल यांचा माशांचा व्यवसाय करत होते. त्यांचे त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. त्यांची पत्नी रिंकूला जेव्हा नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाबाबत कळले तेव्हा तिने त्यांना विरोध केला. तरीही तिच्या नवऱ्य़ाने तिचे ऐकले नाही. ती त्याला सोडून कायमची माहेरी निघून गेली. तेव्हापासून हे नवरा-बायको एकमेकांचा द्वेष करत असत. ती तिच्या माहेरी आनंदाने आयुष्य जगत होती.

सोमवारी रिंकू तिचे सासर असलेल्या परिसरात एका नर्सच्या रक्ताचे नमुने घेण्याकरिता आली होती. याच परिसरात राजू मंडलचे घर होते. त्याने रिंकूला तेथे पाहिले. आपल्याला सोडून माहेरी निघून गेलेल्या बायकोला आपल्या घराजवळ बघून तो संतापला. संतापाच्या भरात तो धारदार शस्त्र घेऊन बायकोच्या जवळ गेला.

तिला पकडून त्या शस्त्राने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. एकामागोमाग एक असे 128 वार त्याने पत्नी रिंकूवर केले. यावेळी त्याच्या पत्नीला कोणीही वाचवायला आले नाही. त्यानंतर पोलिसांच्या भीतीने त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले आणि आत्महत्या केली.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच चुचुडा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजूचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवला असून गंभीर जखमी झालेली रिंकू मंडल मृत्यूशी झुंज देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here