खेड – घरडा कंपनी स्फोटात आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

अलिबाग – सोगावकर – खेडजवळच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा सोमवारी मृत्यू झाला, यामुळे मृतांचा आकडा आता 5 झाला आहे. 20 मार्च रोजी घरडा रासायनिक कारखान्याच्या प्लँट क्रमांक 7 मध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर ऐरोली येथील रुग्णालयात गेले दहा दिवस उपचार सुरू होते.

20 मार्च रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास रिअॅक्टरचे तापमान अचानक वाढल्याने स्फोट झाला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा सकाळच्या नाश्त्याची वेळ असल्याने प्लँन्टमधील बहुतेक कर्मचारी कंपनीच्या कँटीनमध्ये जमा झाले होते. मात्र बाळासाहेब गाढवे (49), संशोधन अधिकारी आशिष चंद्रकात गोगावले (31), मेंटेनन्स विभागाचे फिटर महेश कासार (26), उपव्यवस्थापक राजेश मानदकार (39), आणि सुरेश कवडे हे स्फोटाच्या ठिकाणी काम करत होते. यामधील सुरेश कवडे वगळता अन्य चारही जणांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर सुरेश कवडे याला उपचारांसाठी ऐरोली येथील बर्न्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here