नियमापेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्याने दोंडाईचा येथे लग्न समारंभावर दंडात्मक कारवाई

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – कोरोनाने दोंडाईचा शहरासह परिसरात चांगलाच कहर केला आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे आज पालिका व पोलिस प्रशासनाने अचानक पाच लग्न सोहळ्यांना भेटी देत पाहणी केली. त्यात नियमांचे पालन न करणार्‍या लग्न सोहळ्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लग्नसमारंभात पन्नास जणांनाच प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. असे असतांना येथे लग्न सोहळ्यात 70 ते 80 वर्‍हाडी दिसून आले.त्यात अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हेत, सोशल डिस्टन्सचेही पालन केले जात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे एकुण पाच लग्न सोहळ्यातून एकुण 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, कर निरीक्षक ब्राम्हणकर, नगर रचनाकार स्वप्नील गायकवाड, रुपेश पाटील, मिलिंद पिंपळे, मनोज बोरसे, नितीन चौधरी, अनिल बागुल, भरत चौधरी आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here