शिंदखेड्यातील पत्रकार प्रा. प्रदीप दीक्षित यांच्यावर हल्ला; हल्लेखोर पवन राजपूतला अटक

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – शिंदखेडा येथील पत्रकार व सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप वासुदेव दीक्षित यांच्यावर आज रथगल्ली चौकात एकाने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

संशियत पवन कोमलसिंह राजपूत हा प्रा. दीक्षित यांच्या रथगल्ली येथील जुन्या राहत्या घरी दगडफेक करीत होता. याबाबत कळताच ते दीक्षित तेथे गेलेे. तेव्हा पवन राजपूत याने त्यांना शिवीगाळ करून दगड मारुन फेकला. डोक्यावर दगडाने मारहाण केली. त्यामुळे श्री. दीक्षित हे आपल्या दुचाकीसह खाली पडले. मारहाणीत त्यांचा चष्मा फुटला. पत्रकार विनायक पवार यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान डोक्याला मार लागल्याने प्रा. दीक्षित यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे यांच्यासह पथकाने पवन राजपुत याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पवन राजपूत याने शिंदखेडा शहरासह परिसरात घरफोड्या, चोरी करणे, मारहाण, महिलांची मंगलपोत हिसकावून नेणे, अशा गुन्ह्यात माहिर असून त्यांच्यावर शिंदखेडा पोलीस ठाण्यासह जिल्हा व राज्याबाहेरील पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार प्रा.प्रदीप दीक्षित, विनायक पवार, योगेश चौधरी, जितेंद्र मेखे, योगेश चौधरी, धनराज निकम आदींसह पत्रकारांनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here