सोलापूर (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करून भविष्यात लॉकडाउन न होणेबाबत व शहरातील दुकाने आस्थापना यांची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करावे अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेस उद्योग व वाणिज्य विभागाच्या वतीने उद्योग व वाणिज्य सेल विभागाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
निवेदन देताना शहराध्यक्ष पशुपतीनाथ माशाळ, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व उपाध्यक्ष तथा उद्योग व वाणिज्य विभागाचे सदस्य श्री.दत्ताअण्णा सुरवसे, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघाचे अध्यक्ष श्री.उदय शंकर चाकोते, सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष श्री बसवराज मनोरे, सोलापूर शहर जिल्हा उद्योग व वाणिज्य सेल विभागाचे सदस्य राजेंद्र शहा, मोहन वैद्य, अतुल शहा, पारस गोयल, प्रकाश औसेकर, किसन साळुंखे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षापासून संपूर्ण व जगभरात कोरोनाचा महामारीचा कहर पुन्हा अतिशय तीव्र होत चालला आहे. परंतु सध्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे. तरी शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षमपणे कार्यरत रहावे असे आपणास या पत्राद्वारे विनंती करीत आहोत. गेल्या वर्षी या संकटांमध्ये लॉक डाउन काळात शहरातील व जिल्ह्यातील संपूर्ण व्यापार अतिशय डबघाईस आला आहे भविष्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बेरोजगारी अतिशय प्रचंड पणे होऊन गोरगरीब जनतेचे उपासमार होणार आहे तसेच शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी दुकानदार कारखानदार छोटे लघुउद्योजकांची पुन्हा दमछाक होऊन उद्योगधंदे बंद पडण्याची शक्यता आहे मागील काळातील या परिस्थितीमध्ये अडचण खूप तीव्र झाली आहे यामुळे व्यवसायात पूर्णतः सध्या सुरळीत नाहीत.
सर्व दुकानदार, कारखानदार, व्यवसाय खंबीरपणे कोरोनाचा प्रादुर्भावाचा कडक नियम आत्मसाथ करून स्वतःचा जीव मुठीत ठेवून नागरिकांचे कुठलेही गैरसोय न करता स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. सध्या ई कॉमर्सच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसायामुळे शहरातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. मागील काळातील लाईट बिलाचे सवलत त्यांना अद्याप मिळाले नाही. ती सवलत पुर्णतः मिळावी अश्या खडतर परिस्थितीत अडचणीच्या काळात व्यवसाय करत असताना नुकतेच महानगरपालिकेने व्यापारी वर्गाने कराची रक्कम न भरल्यामुळे त्यांचे दुकान सील करीत आहेत ही बाब अन्यायकारक आहे. तेव्हा अशा परिस्थितीत कर भरण्याकरिता पुढील सहा महिन्याची मुभा देऊन सील केलेले दुकान ताबडतोब उघडून अभय द्यावे. व्यापारी वर्गानी स्वतःची व जनतेची निश्चितपणे काळजी घेत असतात. त्यामुळे पुन्हा भविष्यात लॉकडाऊन ही न परवडणारी आहे. कारण व्यापारी वर्गाला अनेक नोकरदाराचा पगार बँकेचा हप्ता हा नियमितपणे भरावा लागतो. तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून लॉकडाउन होऊ नये. याची माननीयांनी काळजीपूर्वक दक्षता घ्यावी. तसेच दुकाने व आस्थापनेची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत असावी अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेस उद्योग व वाणिज्य विभागाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन मा. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे साहेब यांच्याकडे देऊन निवेदनाद्वारे मागणी करत आहोत.






