जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या रुग्णांपैकी आज 1139 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
आज आढळलेल्या ११३९ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर २८३ ,जळगाव ग्रामीण १७, भुसावळ ७७,अमळनेर ९३, चोपडा २७७ ,पाचोरा ३५, भडगाव २० ,धरणगाव ५६,यावल २८,एरंडोल ३९ ,जामनेर ३३, रावेर २१,पारोळा १८, चाळीसगाव ९७, मुक्ताईनगर ११, बोदवड १७ आणि इतर जिल्ह्यातील ०७ असा समावेश आहे.
आज दिवसभरात रूग्ण ९९६ बरे झाले असून आतापर्यंत एकूण ७५५९० रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ११८०३ रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८९०१८ झालेली आहे. जिल्ह्यात आज १४ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १६२५ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली






