मावळा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा चंचल पवार यांच्यावतीने अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे शहरातील गोर गरिबांच्या वस्तीत मोफत वाटप

दोंडाईचा (संतोष कोळी) – मंगळवारी (दि.२१) उत्तर महाराष्ट्र मावळा संघटना यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी आता होमिओपॅथी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात येत आहे. जिल्हात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे पण शासनाच्या सुचनांचे व्यवस्थित पालन केल्यास कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे. यात सगळ्यांची मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, समुहात जाणे टाळणे, फिजिकल डीस्टन्सिंगचे पालन करण्यावर भर दयावा, तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विटॅमीन-सी या गोळ्यांचे सेवन करावे अशा सुचना शासना मार्फत करण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मावळा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा चंचलताई पवार यांनी मावळा संघटनेच्या वतीने दि. २१ जुन २०२०, मंगळवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शहरातील देवपुर भागातील विविध परिसरात अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे मोफत वाटप केले. व यानंतरही शहरातील विविध परिसरात अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येईल असे यावेळी मावळा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा चंचलताई पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here