दोंडाईचा (संतोष कोळी) – रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना
संसर्ग होऊ नये यासाठी हात स्वच्छ करण्यासाठी हँन्ड सँनिटायझरसह स्टँड डिजी प्रशांत जानी ,सौ हेता जानी यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी उद्योगपती सरकारसाहेब रावल ,पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देवीदास पाटील , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे , डॉ प्रफुल्ल दुग्गड , डॉ अमोल भामरे , डॉ हितेंद्र देशमुख ,डि जी एन श्रीकांत इंदाणी ,अँसि.डिजी अनिश शाह , रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा ,प्रो चेअरमन सौरभ मुणोत ,संजय छाजेड , डॉ अनिल धनगर ,प्रविण महाजन ,अमन जयस्वाल , इ मान्यवर उपस्थित होते .
शहरातील पोलिस स्टेशन ,उप जिल्हा रुग्णालय ,बस स्थानक ,रेल्वे स्टेशन , बाजार पेठ , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इ ठिकाणी हँन्ड सँनिटायझरसह स्टँड देण्यात येत आहेत . नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेले उपकरण व्यवस्थीत हाताळावीत तसेच जवळपास असणारे नागरीकांनी उपकरणांची सुरक्षा ठेवावी असे आवाहन सरकारसाहेब रावल यांनी केले .







