औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपअभियंता हिरामण गालफाडे यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. माजलगाव येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने मतदार संघातील हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नालीचे बांधकामाचे पूर्ण झाले होते मात्र याचे बिल देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला उपअभियंता गालफाडे हे बारा हजार रुपये टक्केवारी मागत होते परंतु काम केले असल्याने टक्केवारी देण्यास ठेकेदाराने असमर्थता दाखवत सहा हजार रुपये देतो असे म्हणून तडजोड केली त्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली
त्यानुसार बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई उपाध्यक्ष बाळकृष्ण हनपुडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






