बॅकलेस ब्लाऊजमुळे सारा अली खान झाली ट्रोल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री सारा अली खान ही कधी तिच्या ग्लॅमरस व बोल्ड लूकमुळे तर कधी साध्या सिंपल लूकमुळे चर्चेत असते. त्यावरून अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं.

नुकतंच साराने लेहेंगा चोलीत फोटोशूट केले असून त्यात ती फारच ग्लॅमरस दिसली आहे. या लेहेंग्यासोबत तिने बॅकलेस चोली घातली आहे. या बॅकलेस चोलीला मागे कोणतेही हूक किंवा लेस नसल्याने नेटकऱ्यांनी तिला तू ही चोली घातलीस तरी कशी? असा सवाल केला आहे.

साराने डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या नूरानियत कलेक्शनमधील राखाडी रंगाचा लेहेंगा घातला असून त्याच्या फोटोशूटचा व्हिडीओ व फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. यात ती फारच सुंदर दिसतेय मात्र काही नेटकऱ्यांना तिची चोली आवडली नसून त्यांनी तिला ट्रोल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here