पणजी – राखी सावंत आता मोठ्या पडद्यापासून दूर गेली असली तरी, आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती सतत चर्चेत असते. तिच्या लग्नातील वाद आणि बिग बॉसमुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्धी माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष आपल्याकडं वळल्यानं राखी सावंत सध्या एकदम फॉर्मात आहे.
आईच्या आजारपणासाठी पैसे मिळवण्यासाठी तिनं बिग बॉस 14 मध्ये भाग घेतला. आईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या राखीचं रूप चाहत्यांना भारावून गेलं. तिच्या संकटात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आणि तिच्याबद्दल लोकांचे प्रेम आणि आदरही वाढला. या सगळ्यामुळे राखी सध्या आनंदात आहे.
नुकतीच ती गोव्यात सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिनं खूप धमाल केली. इथल्या एका क्लबमध्ये तिनं तिचं हिट झालेलं परदेसीया हे गाणं गायलं. एवढंच नव्हे तर बिग बॉस 14 मधील मेमे सॉंग ‘क्या ये साधनी थी’ यावरही परफॉर्म केलं. तिनं स्वतःच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गोव्यात खूप मजा केली. मी खूप मजेत आहे, थँक यु गॉड! असं तिनं म्हटलं आहे.
या आधी होळीच्यानिमित्तानं लाल रंगाच्या लेहंग्यातील आपला व्हिडिओ शेअर केला होता. सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देत तिनं होळीच्या वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य केलं होतं. त्याचा व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यालाही चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.






