या देशात महिला सैनिकांना वापरावी लागतात पुरुषांची अंतर्वस्त्र

स्वित्झरलँड – येथील सैन्यात एक अत्यंत विचित्र व्यवस्था आतापर्यंत चालत आली आहे. स्विस आर्मीच्या व्यवस्थेनुसार पुरूषांप्रमाणेच महिलांना देखील पुरुषांची अंतर्वस्त्र (जेंट्स अंडरवेअर) घालणे बंधनकारक आहे. आता ही व्यवस्था बदलण्यात येणार असल्याने हा विषय चर्चेत आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे महिलांची सैन्यातील भागीदारी वाढू शकते.

स्विस आर्मीचे प्रवक्ते काज गनर सिएवर्ट यांनी स्विस न्यूज वेबसाइट वॉटसनसोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, लष्कराकडून उपलब्ध होणारे कपडे आणि बऱ्याच गोष्टी जुन्या पद्धतीने आतापर्यंत सुरू होत्या त्यात बदल करणे आवश्यक होते.

आता पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही आणि आम्हाला आधुनिकेतेप्रमाणे बदलणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, याआधी देखील लष्कराचा यूनिफॉर्म आणि उपकरण महिला सैनिकांच्या सुविधाप्रमाणे नव्हते आणि म्हणूनच आम्ही त्यासंदर्भात महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत.

सिएवर्टने म्हटले आहे की, महिलांसाठी उन्हाळ्यात शॉर्ट अंतर्वस्त्र आणि थंडीत के लिए लॉन्ग अंतर्वस्त्र अशी व्यवस्था करण्यात येईल. याशिवाय कॉम्बेट क्लोदिंग, प्रोटेक्टिव वेस्ट आणि बॅकपॅक देखील आणखी करण्यावर जोर आहे. आमचं संपूर्ण लक्ष फिट आणि फंक्शनल यूनिफॉर्मवर असेल, असेही ते म्हणाले.

स्वित्झरलँडच्या संरक्षण मंत्री वायोला एमहर्डने देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर स्विस नॅशनल काउंसिलचे सदस्या मेरिएन बाइंडर यांनी सांगितले आहे की, या निर्णयामुळे महिलांना सैन्यात जॉइन करण्यासाठी प्रेरित होतील. स्विस इंफोच्या रिपोर्टनुसार, स्विस आर्मी यूनिफॉर्म 80 च्या दशकापासून चालत आला आहे.

पुढल्या महिन्यापासून यावर ट्रायल सुरू होणार आहे. स्विस आर्मीमध्ये महिलांचा सहभाग केवळ 1 टक्का आहे. लष्कारात महिलांना पुरुषांप्रमाणे सर्व काम करावे लागते. स्विस आर्मीच्या डिफेंस अध्यक्षांना आशा आहे की या निर्णयामुळे वर्ष 2030 पर्यंत स्विस आर्मीत महिलांचा सहभाग वाढून 10 टक्क्यावर पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here