नेरुळमध्ये घुबड जातीच्या पक्षाला सर्पमित्राने दिले जिवदान

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नेरूळ सेक्टर नं ६ येथील नवरत्न अपार्टमेंट मध्ये घुबड जातीच्या पक्षाला कावळे पक्षी हल्ला करत असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र लगाडे यांच्या लक्षात आले असता त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन WWA या संस्थेचे सर्पमित्र दिपक गायकवाड यांना फोनद्वारे माहिती कळली असता सर्पमित्र दिपक गायकवाड यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली व मोठ्या शिताफीने घुबड जातीच्या पक्षाला कावळ्याच्या तावडीतून सोडवले व पकडुन जंगलात सोडून जिवदान दिले.

काही दिवसांपुर्वीच वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन( WWA) संस्था व वनविभाग यांच्या वतीने बेलापूर जवळील खाडी मध्ये सात फुट लांबीची मगर पकडण्यात आली होती त्यामुळे परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करुन पशु, पक्षी, प्राणी यांच्या विषयी माहिती देत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here