अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

rajanikant

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावणारे सुपरस्टार म्हणजेच रजनीकांत. त्यांना वयाच्या ५१व्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली.

यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here