तक्रारीची नोंद झाल्यानंतर गुन्हा दाखल करणं ही पोलिसांची जबाबदारीच – हायकोर्ट

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – कायद्यानं तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांकडे १५ दिवसांचा ते ६ आठवड्यांचा अवधी असतो. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेसह अन्य दोन याचिकांवर सुनावणी सुरू आहे. जयश्री पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल का झाला नसल्याची कोर्टाची विचारणा असून आता कोर्टाने आदेश दिले तर परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्याची केंद्राकडून दाखवली जाऊ शकते.

मलबार हिल पोलीस स्टेशनची डायरी येण्यास इतका वेळ का, तक्रारीची नोंद झाल्यानंतर गुन्हा दाखल का झाला नाही, असा थेट सवाल हायकोर्टानं सरकारी वकिलांना केला. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात परमबीर यांच्या लेटरबॉम्बसंदर्भात स्वतः परमबीर यांच्या जनहित याचिकेशिवाय अन्य दोन याचिकांवरही सुनावणी सुरू आहे. यामध्ये एक याचिका ही, वकील घनश्याम उपाध्याय यांची आहे तर आणि दुसरी गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची आहे. स्वतः वकील असेलल्या जयश्री पाटील यांनी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक झाल्यावर मुंबई पोलिसात तक्रारही दाखल केली होती. घनश्याम उपाध्याय यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुभाष झा यांनी युक्तिवाद केला. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर त्यांनी स्वतःच युक्तिवाद केला आहे.

सदर याचिकांच्या सुनावणी दरम्यानच हायकोर्टानं सरकारी वकिलांना हा सवाल केल्याचं कळत आहे. मलबार हिल पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत जयश्री पाटील यांच्या तक्रारीची नोंदच नाही, अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टात दिली. याच आधारे, सदर माहितीचा अर्थ असा की १० दिवसांत तुम्ही या तक्रारीकडे पाहिलेलंही नाही, आम्ही याची नोंद घेतोय, अशी परखड भूमिका हायकोर्टाकडून मांडण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here